झूम : दुचाकीलाही हवी ‘एअर बॅग’

Air-Bag
Air-Bag
Updated on

रस्ते अपघातात जीवितहानी टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनांमध्ये विविध सुविधा दिल्या जातात. त्यातीलच ‘एअर बॅग’ हे महत्त्वाचे सुरक्षा कवच. सध्या सर्वच कारमध्येच एअर बॅगचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात कारच्या तुलनेत दुचाकी अपघातात जखमी वा मृत पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती असली, तरी शरीराच्या इतर अवयवांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची आहे. याचसाठी कारप्रमाणे दुचाकींनाही एअर बॅगचा विचार होण्याची आवश्यकता आहे.

एअर बॅग कार्यप्रणाली

  • वाहनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने लावलेली यंत्रणा म्हणजे एअर बॅग अर्थात एसआरएस (सप्लिमेंट रिस्ट्रेन सिस्टीम). बहुतांश वाहनांमध्ये एअर बॅग नायलॉनपासून बनवलेल्या असतात. 
  • कारमध्ये ही बॅग विशिष्ट पद्धतीने घडी घालून स्टेअरिंगवरील हॉर्नच्या बटनाखाली आणि डॅशबोर्डमध्ये बसवलेल्या असतात. 
  • समोरून एखादे वाहन किंवा अन्य काही वस्तू गाडीवर आदळणार याची जाणीव होताच, हे सेन्सर एअर बॅग मॉड्युलला संदेश पाठवतो व यंत्रणा कार्यान्वित होते.
  • सर्व प्रक्रियेनंतर या एअर बॅग नायट्रोजन गॅसने भरून उघडतात. अपघात घडताना एअर बॅगला कार्यान्वित होण्यास तीन मिली सेकंदांचा वेळ लागतो. 

दुचाकीतही बॅग आवश्यक
एअर बॅग कारप्रमाणेच दुचाकीवर स्वार असलेल्यांसाठी विविध प्रकारच्या अपघातात सुरक्षा कवच ठरणार आहे. दुचाकीच्या सिटमध्ये ही एअर बॅग फिट करता येऊ शकते. एखादी दुचाकी ठराविक वेगात असल्यास तिच्यातील वेगाचे सेन्सर, वेग नियंत्रक अचानक पुढून किंवा पाठीमागून आलेला दाब, शिवाय दुचाकीवरील नियंत्रण ढासळल्याचे लक्षात येताच या सिटमध्ये असलेली एअर बॅग उघडेल. अशावेळी एअर बॅगसह लागलेले बेल्ट दुचाकीस्वाराला सिटवरून सुरक्षित काढून एअर बॅगने लपेटून सुरक्षित ठेवते. ठराविक वेगातच ही यंत्रणा कार्यान्वित होते. त्यामुळे प्रत्येक वेळी ही एअर बॅग उघडेलच याची शाश्वती देता येत नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोल्ड विंग
होंडा मोटार कंपनीने जगात प्रथमच ‘गोल्ड विंग’ या दुचाकीत एअर बॅगची सुविधा दिली आहे. समोरून जोरदार टक्कर लागल्यास दुचाकीस्वार पुढील वाहनास किंवा इतर गोष्टींना धडकण्याची शक्यता असते. अशावेळी चालकाच्या हालचाली त्वरित लक्षात घेऊन ही एअर बॅग उघडते आणि संभाव्य हानी टाळते. परंतु होंडाच्या गोल्ड विंगमधील ही बॅग केवळ समोरून टक्कर बसल्यावर उघडते. पाठीमागून धक्का लागल्यास किंवा दुचाकी घसरून पडल्यास ती उघडत नसल्याने पूर्ण सुरक्षेच्या बाबतीत ती मागे पडते. 

जॅकेट्स
एअर बॅगची सुविधा असलेले काही जॅकेटही बाजारात उपलब्ध आहेत. एअर बॅग जॅकेटमध्ये एक्सलरेशन सेंसर लागलेले असतात, ज्याच्या मदतीने जॅकेटमधील यंत्रणेला दुचाकीची समोरील वाहनाला केव्हा टक्कर होईल किंवा दुचाकी पडणार असल्याचे लक्षात येते. जॅकेटच्या ज्या भागात ही एअर बॅग ठेवलेली असते तेथेच ती अपघाताच्या वेळी दोन ते तीन इंचापर्यंत फुगते. यामुळे दुचाकीस्वाराचे खांदे, छाती, मणका आदी भागांना होणारी गंभीर इजा टळू शकते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.