दीर्घायुषी बाईकसाठी... 

दीर्घायुषी बाईकसाठी... 
Updated on

कोरोनामुळे देशभरात सध्या लॉकडाउन असल्याने वाहने एकाच जागेवर धूळ खात पडून आहेत. बाईक एकाच जागेवर राहिल्याने पुढे बाईक चालवताना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्यापैकी अनेक वाहनाची योग्य प्रमाणात काळजी घेत नाहीत. त्यामुळे काही दिवसांनंतर बाईकमध्ये बिघाड झाल्याचे दिसते. बाईकला व्यवस्थित ठेवण्यासाठी काही टिप्स... 

इंजिन 
बाईकचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे तिचे इंजिन. इंजिनला सतत सर्व्हिसिंग करण्याची गरज असते. सर्व्हिसिंगच्या वेळी कार्बोरेटर आणि व्हॉल्व्हची तपासणी नक्‍की करून घ्या. दूरवर प्रवासासाठी निघणार असल्यास किंवा आल्यानंतर बाईकच्या स्पार्क प्लगची तपासणी करून घ्या किंवा तो बदलून घ्या. बाईकने दीड हजार किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर एकदा कार्बोरेटर नक्‍की स्वच्छ करा. 

इंजिन ऑईल 
बाईकचे इंजिन अधिक क्षमतेने चालण्यासाठी इंजिन ऑईल वेळेवर बदलणे आवश्‍यक आहे. यासाठी इंजिन ऑईलची पातळी (लेव्हल) सतत तपासून घ्या. कमी इंजिन ऑईलमध्ये बाईक चालवल्यास इंजिनचा आतील भाग घासला जातो आणि त्यामुळे इंजिनाचे आयुष्य कमी होते. प्रत्येक दोन हजार ते तीन हजार किलोमीटरनंतर एकदा इंजिन ऑईल बदलण्यास विसरू नका. 

एअर फिल्टर 
बाईकची कामगिरी चांगली राहण्यासाठी एअर फिल्टर स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. बाईकचा एअर फिल्टर वेळेवर स्वच्छ करण्यासह वर्षातून एकदा एअर फिल्टर बदलणेही आवश्‍यक आहे. 

क्‍लच 
बाईकच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी क्‍लचची योग्य ॲडजेस्टमेंट असावी. क्‍लच खूप टाईट अथवा मोकळा असू नये. बाईक चालवताना क्‍लच दाबून ठेवू नये, यामुळे इंजिनावर दाब पडतो. परिणामी मायलेजवर परिणाम होतो. 

चेन आणि गिअर 
बाईकची चेन आणि गिअर हे दोन महत्त्वाचे भाग आहेत. ते सुस्थितीतच असावेत. बाईकची चेन अधिक टाईट किंवा मोकळी असू नये. चेनला कधीही पाण्याने साफ करू नका. त्यामुळे गंज पकडण्याची शक्‍यता असते. सर्व्हिसिंग झाल्यानंतर चेनला लुब्रिकंट नक्‍की करा. यामुळे चेन कमी घासते आणि गंज लागण्याची समस्याही राहत नाही. बाईक सुरू असताना गिअरची विशेष काळजी घेतली पाहिजे. बाईक उभी असताना विनाकारण गिअर टाकू नका. गिअर टाकताना झटका देऊ नका, तसेच जोरात दाबू नका. त्यामुळे गिअर बॉक्‍स लवकर खराब होऊ शकतो. 

ब्रेक 
ब्रेकची वेळोवेळी तपासणी करावी. ड्रम ब्रेक असणारी बाईक चालवत असाल, तर ब्रेक ढिले झाल्यानंतर अथवा ब्रेक कमी लागल्यानंतर ब्रेक पॅड नक्‍की बदला. डिस्क ब्रेक असणाऱ्या बाईकमध्ये ब्रेक ऑईलची नेहमी तपासणी करा. ब्रेक ऑईलची कुठे गळती होत नाही ना, याकडे लक्ष ठेवा. डिस्कवर जमा झालेली धूळ, माती सतत साफ करण्यास विसरू नका. 

बॅटरी 
बाईकच्या बॅटरीची वेळोवेळी तपासणी करणे आवश्‍यक आहे. बॅटरीमध्ये कोणतीही गळती असल्यास ती तात्काळ बदलून घ्यावी. बॅटरी डाऊन झाली असल्यास ती तात्काळ चार्ज करावी. नेहमी चांगल्या दर्जाची आणि नामांकित कंपनीची बॅटरी बसवावी. 

टायर 
टायरमध्ये हवा पुरेशा प्रमाणात ठेवण्यासाठी सतत काळजी घ्या. हवा भरताना मीटरचा वापर करा. ग्रिप असणाऱ्या टायरचाच वापर करा. टायर जुने झाल्यानंतर अथवा त्यावर क्रॅक दिसल्यास ते तात्काळ बदलून घ्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.