YIN मंत्री करणार 'या' मागण्यांचा पाठपुरावा...

YIN convention
YIN conventionesakal
Updated on

नाशिक : समाजकारण, राजकारण, सहकार, कृषी, आरोग्‍य, प्रशासन अशी सर्वांगिण चर्चा 'सकाळ माध्यम समूहा'च्‍या 'यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क' (YIN) च्‍या अधिवेशनात घडली. पारीत केलेल्‍या २६ ठरावांपैकी सहा महत्त्वाच्‍या मुद्यांवरील सखोल संशोधन संबंधित विभागाच्‍या शॅडो कॅबिनेट (Shadow cabinet) मंत्र्यांनी सभागृहासमोर सादर करतांना खऱ्या अर्थाने अधिवेशनाचे फलीत झाले. पुढील आठवड्यात हा सविस्‍तर अहवाल संबंधित खात्‍याच्‍या मंत्र्यांना हे यिन मंत्री सादर करणार असून, मागण्यांचा पाठपुरावादेखील करणार आहेत. (YIN convention 2021 Shadow cabinet resolution)

सखोल अभ्यास, संशोधन हेच यिन अधिवेशनाचे फलीत

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या प्रांगणातील यश-इन सभागृहात पार पडलेले तीन दिवसीय यिन अधिवेशनाचा रविवारी (ता.१) समारोप झाला. यिन शॅडो कॅबिनेटच्‍या मंत्री मंडळाने निर्धारीत २६ ठराव सभागृहात पारीत केले. यापैकी सहा विषयांतील सखोल अभ्यास करुन संशोधनावर आधारीत उपाययोजनादेखील सूचविल्‍या आहेत. यात प्रामुख्याने बेरोजगारी व कौशल्‍यविकास, कृषी, युवती सक्षमीकरण, शैक्षणिक शुल्‍कमाफी या विभागांशी निगडीत प्रस्‍ताव त्‍या-त्‍या विभागातील मंत्री महोदयांना सादर केला जाणार आहे.

यिन मंत्रीमंडळ करणार महाराष्ट्र दौरा

अधिवेशनानंतर येत्‍या १५ ऑगस्‍टपासून यिन मुख्यमंत्री अजय खांडबहाले, उपमुख्यमंत्री विशाल पाटील हे राज्‍याचा दौरा करणार आहेत. नागपूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्‍हापूर, सातारा, पूणे, मुंबई आदी ठिकाणचा दौरा करतील. या दौऱ्यात यिन शॅडो कॅबिनेट मंत्री, सामाजिक संस्‍था, 'सकाळ'चे संपादक, जिल्‍हा प्रतिनिधींसोबत बैठका घेतील. सोबतच स्‍थानिक महाविद्यालयांना भेट देवून तेथील प्राचार्यांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

YIN convention
युवा नेतृत्वामध्ये बदल घडवण्याची शक्ती : पोलीस अधीक्षक सचिन पाटील
Summary

असे आहेत यिन मंत्रीमंडळाने मांडलेले ठराव...

https://dai.ly/x83374d
YIN convention
YIN : 'प्रश्नांची सोडवणुकीसाठी समाजातील छोटा घटक विचारात घ्या'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.