BLOG : जगण्यात नवलाई आहे!

BLOG : जगण्यात नवलाई आहे!
Sakal
Updated on

- ​डॉ. प्रज्ञा विजय घोरपडे

कोवीड-१९ महामारीमुळे जगभरातील सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. या जागतिक महामारीचा संपूर्ण जग निकराने सामना करीत आहे. जेवणाच्या वाटचालीमध्ये अडथळे आणि संकटे येतच राहतात. मात्र अशा अडथळ्यांवर, संकटावर मात करीत त्याचे संधीत रूपांतर करून मार्गक्रमण करणारी यशस्वी होतात.

जागतिक स्तरावर अनुभवास आलेला, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला कदाचित हा असा पहिलाच खडतर प्रसंग असेल. पण जगाच्या पाठीवर शेकडो वर्षांचा इतिहास असणाऱ्या विद्यापीठाच्या इतिहासात मात्र ही घटना काही नवीन नाही. यांच्या इतिहासात असे असे अनेक Pandemics आली आहेत; पण म्हणून काही त्यांचे 'फुलंण' थांबलेले नाही. त्याचप्रमाणे आज ओस पडलेली विद्यापीठे, आपली कॉलेजेस उद्या पुन्हा निश्चित फुलतील यात शंका नाही. हा लेख लिहित असताना सभोवार सुरू असणारे मृत्यूचे तांडव, कोरोनाच्या निमित्ताने जीवनाची वाढलेली अनिश्चितता आणि शिक्षणासह सर्व क्षेत्रात झालेले न-भूतो-न भविष्यती असे अमुलाग्र बदल यांची दखल घ्यावीच लागेल.

BLOG : जगण्यात नवलाई आहे!
पुणे-नाशिकचा प्रवास होणार सुसाट; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण

​आजवर आपण खूप धावलो. सहाजिकच प्रवासाची साधनं, संवादाची साधनं, यंत्र फक्त वेगाची ' सबसे तेज' भाषा बोलत होती. झटपट आराम, झटपट पैसा, झटपट प्रगती असं म्हणत आपण सर्व जण पळत होतो. कोरोना आपत्तीने या सगळ्या गोष्टीला करकचून ब्रेक लावला आहे. धावत सुटलेल्या जगाला या कोरना आपत्तीने स्वल्पविराम दिला अंतर्मुख केलं. आणि मग परत एकदा आपण आपल्याचं जगण्याकडे मागे वळून नवलाईने बघायला लागलो आहोत. मग जाणवतं की, धावपळीत वाटेतले अनेक सुंदर थांबे बघायचे राहून गेले. छंद अपूर्ण राहिले. बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या म्हणतात ना, 'लाईफ में कुछ ना कुछ तो छुटेगाँही, तो जहाँ है, वहीं का मजा लेते हैं'! हे अगदी खरं आहे. जिथे आहोत तिथेच सुखाची इवंलीशी फुलपाखरं बघायला आवश्यक असलेली उंसत आता आपल्या सर्वांनाच मिळालीय. भाकरीच्या मागे प्रत्येकाला धावावचं लागते; पण आधी सारखं उर फारेस्तो नाही, एवढं तरी आता आपल्याला कळालयं. गती हवीच पण किती? जगण्यात कुतुहलाने डोकावतं रमत गंमत पुढे जाता येईल.... एवढीच!

BLOG : जगण्यात नवलाई आहे!
दुर्दैवी! चिमुकल्याला वाचवायला गेलेल्या दहा जणांवर काळाचा घाला!

​आपल्या सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनात त्या कोरोनाने मोठा झटका दिला हे मात्र खरं. हा हा म्हणता हे संकट सगळ्या जगावरती घोंघावू लागलं व त्याने संपूर्ण विश्वच ठप्प करून टाकले. पण या काळात आपण सर्वजण हे शिकलो की आयुष्यात संकट, आव्हान सांगून कधीही येत नाहीत. बेसावध क्षणांनी काही काळ अस्थिर व्हायला होतं खरं! पण तरी पुन्हा पाय घट्ट रोवून उभं राहायचं व समोर येणाऱ्या परिस्थितीचा आपण सामना करायचा हे मनाशी एकदा पक्कं ठरवलं की भल्याभल्या संकटांना नाही आपण परतवू शकतो हा विश्वास या प्रसंगाने आपणास दिला. या संकटकाळातही आपण आपल्या जगण्यातील नवलाई शोधून आनंदी जगणे हेच मोठे औषध म्हणावे लागेल. कारण, बाहेर विश्वात काहीही झालं तरी फुलांच्या उमलण्यात सुगंध व सौंदर्य पसरविण्यात खंड पडत नाही तसं आपल्या निर्धारात, नियमात व आचरणात आपण अखंडता ठेवूया! सध्या सगळीकडून अंधारून आल्यासारखं वाटलं; तरी एखादा प्रकाशाचा किरण आपल्याला निश्चितच मार्ग दाखवू शकेल. म्हणूनच आपण बाहेरील परिस्थितीचा गुलाम न होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन, मनाची स्थिरता, स्वाध्याय व कृती या चार पैलूवर केंद्रित होऊन मार्गक्रमण करूयात!.

BLOG : जगण्यात नवलाई आहे!
कोरोनानंतर Monkeypox चा धोका; अशी आहेत लक्षणे

​आता मागे येता येता आपण नोंद न घेतलेले सुखाचे चिमुकली स्तोत पाहूयात. उदा. एखाद्या कलेच्या अव्‍द‍ितीय अविष्कारापासून, विज्ञानातल्या रहस्यांचा स्वतःला उलगडा होण्यापासून एखाद्या पुस्तकातल्या शब्दाने अथवा विचाराने झपाटून टाकण्यापासून हलक्या स्पर्शापर्यंत, बाळाच्या निरागस हास्यापर्यंत, मदतीसाठी पुढे केलेल्या हातापासून ते कुठेही विखुरलेले असू शकतात. पण ते शोधण्याची वृत्ती मात्र आपण निर्माण करूयात. तो अनुभव, ते सौंदर्य मनातल्या अवकाशात मुरवत त्याचा तब्येतीने आस्वाद घ्यायला वेळ काढूयात त्यासाठी फक्त आणि फक्त आपलं स्वच्छ, शांत मन व अशा रुपेरी क्षणांच्या स्वागतासाठी मनाची दारं सताड उघडी ठेवूयात!

​कारण, जीवन हे मानवाला लाभलेली अनमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे. कारण माणसाजवळ विचार शक्ती, आचरण शक्ती सत्सत विवेक बुद्धी त्यामुळे जीवनातील नवलाईचा शोध घेऊन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवन ब्रह्माचे रूप आपण सतत अनुभवत राहू एवढे मात्र नक्की! संकटे, अडचणी, नैराश्य, दुःखे, सुख, आनंद या विविध फ्लेवर्स मुळेच आपल्या जगण्याला चव आहे सुख जसे कायम नसते तसेच दुःखही उलट सुखापेक्षाही दुःख अधिक शहाणे, डोळस बनवून सोडते.

BLOG : जगण्यात नवलाई आहे!
अकरावी प्रवेशाच्या ‘सीईटी’साठी सोमवारपासून अर्ज उपलब्ध

​प्रत्येकाला दुःखाच्या झळा पोचतातच पण प्रत्येकाला वसंत बोलवतोच. आज जरी दुःखाचा असही हिवाळा असला तरी सुखाचा वसंतोत्सव आता दूर राहिलेला नाही. हिवाळ्यानंतर वसंताचे आगमन हे ऋतुचक्रच आहे. म्हणूनच यासंदर्भात इंग्रजी साहित्यातील प्रख्यात कवी पी.बी.शेली म्हणतो,

" If Winter is so near Can Spring be not for behind? "

जे जसे आले तसे त्या त्या वेळी स्वीकारणे याहून निराळे काय करायचे असते?

जे काही वाट्याला येईल, त्याला जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, तरल अवधानाने तोंड देवूयात. आणि आपल्या हृदयात ही शायरी नेहमी लक्षात ठेवूयात!

" ऐ बुरे वक्त जरा आदत से पेश आ,

वक्त को वक्त नही लगता वक्त बदलने मे !"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()