एकनिष्ठ, चिकाटी आणि कठोर परिश्रमाने तुमचे स्वप्न सत्यात उतरते.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांचा यिनच्या विद्यार्थ्यांना कानमंत्र.
यिन विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या समवेत.
यिन विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या समवेत.
Updated on

पुणे, ता १२ - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात यिन आणि ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरेबल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'ओळख प्रशासनाची' या उपक्रमाअंतर्गत यिन च्या कोअर टीम ने नुकतीच पुणे जिल्हा परिषद येथे भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. या वेळी त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी उत्तर दिले.

आयुष्य प्रसाद यांच्या प्रशासकीय सेवेत येण्याच्या प्रवाससंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारले असता ते म्हणाले कि एखादे स्वप्न मनाशी बाळगत असताना ते पूर्ण होण्यासाठी एकनिष्ठपणा, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम असणे खूप महत्त्वाचे आहे. शॉर्टकट मुळे कोणतीही गोष्ट जास्त काळ टिकत नाही. सत्य मार्गाने आणि प्रामाणिकपणे केले प्रयत्न यामुळे तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होण्यास मदत होते.

UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना या परीक्षांना अवघड, कठीण परीक्षा न समजता आव्हानात्मक परीक्षा म्हणून पाहणे जास्त गरजेचे आहे. पूर्व परीक्षेचा सराव करत असताना त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलताना स्पष्ट केले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी सर्वांगीण गोष्टींना समान महत्व देऊन आयुष्यभर शिकाऊ वृत्ती ठेऊन हसत खेळत आपले आयुष्य आनंदाने जगावे, असेही मत यावेळेस त्यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरेबल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने यिन कोअर टीमने दिलेल्या भेटीदरम्यान संपूर्ण इमारतीची माहिती घेतली तसेच इथे कशाप्रकारे कामकाज चालते याची सविस्तर माहिती घेतली. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. बोरमाने तसेच डॉ. नाना शेजवळ यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन या वेळी विद्यार्थ्यांना लाभले.

पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या भेटीच्या वेळी यिन अध्यक्ष आशुतोष साठे, वैष्णवी बोली, प्रतीक शिंदे, सोहन घाडगे , सायली कोळी आणि अनिष मुखर्जी तसेच इतर यिन टीम सदस्य उपस्थित होते.

यिनच्या वतीने महाविद्यालयीन तरुणांसाठी विविध उपक्रम राबवले जातात व याचा अनेक तरुणांना नक्कीच फायदा होतो. या उपक्रमामुळे प्रशासन कसे चालते , त्याचे कामकाज कसे पहिले जाते. त्यातील विविध विभाग कसे कार्यरत असतात याची संपूर्ण माहिती या भेटी दरम्यान आम्हाला मिळाली.

- आशुतोष साठे, यिन अध्यक्ष ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरेबल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.