Ajit Pawar : अकोलेत विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण,लाडकी बहीण योजना सुरूच राहील : अजित पवार

Ajit Pawar : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना आणि वीजपंप बिल माफी योजना पुढील पाच वर्षे सुरू राहतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Ajit Pawar, akole ahmednagar
Ajit Pawarsakal
Updated on

अकोले : केंद्रात आपले सरकार असून, राज्यातील सरकारने विविध विकास योजना सुरू करून सर्वसामान्य गरीब, आदिवासी, दलित, ओबीसी, बहुजन समाजाला दिलासा दिला आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण, शेतकरी वीजपंप बिल माफी योजनेसह इतर योजनांसाठी निधीची तरतूद केली आहे. या सर्व योजना पुढील पाच वर्षे सुरू राहतील. त्यामुळे महायुतीच्या मागे भक्कम उभे राहा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अकोले येथे जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते महात्मा फुले चौक ते अगस्ती सहकारी साखर कारखाना रस्ता, बसस्थानक, बाजारतळ व अकोले तहसील कार्यालयाचे लोकार्पण तसेच धुमाळवाडी रस्ता व उपजिल्हा शासकीय रुग्णालय‌च्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, कपिल पवार, कैलास वाकचौरे, विनय सावंत, भीमाशंकर कवडे, पुष्पा लहामटे, सरपंच पुष्पा निगळे, ॲड. वसंत मनकर, दत्ता निगळे उपस्थित होते.प्रसंगी अजितदादा म्हणाले की, राज्यशासनाच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठवली‌.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. गरिबांच्या घरातील मुलींना आता मोफत उच्च शिक्षण घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून महिलांनी विविध गृहउद्योग सुरू केले आहेत. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या योजनेतील आॅक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे आठ दिवसांत भगीनींच्या बॅंक खात्यात जमा होतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.

आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, तालुक्यात अजितदादांनी अडीच हजार कोटी रुपयांचा निधी दिला. अगस्तीला कारखान्याला ९४ कोटी कर्ज दिले. मात्र त्याला खोडा घालण्याचे काम विरोधकांनी केले. तालुक्यात छोटी-मोठी धरणांचे कामे आगामी काळात केली जातील. गोडबोले गेट करून पाण्याचे नियोजन केले जाईल. प्रास्ताविक पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी यांनी केले.

महिला गुलाबी साड्यांत

उपमुख्यमंत्री पवार यांना मुस्लिम समाजाने हिरवी शाल व टोपी घातली. ती शाल अजितदादांनी शेवटपर्यंत काढली नाही. महिलांनी गुलाबी साड्या घालून अजितदादांना ओवाळून राख्या बांधल्या. वेदिका एरंडे हिचा सत्कार, तर उंचखडक शाळेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

मोदी-शहांची महाराष्ट्रावर मेहेरनजर

अकोले तालुक्याची पर्यटन तालुका म्हणून ओळख होण्याची गरज आहे. केंद्रात आपले सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्राबाबत सकारात्मक आहेत. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू पिकांची नुकसान भरपाई सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.