पाथर्डी : मी शब्द पाळणारा आहे, एकदा शब्द दिला, कि मी मागे हटत नाही. येईल म्हटल्यावर मी येतोच. आज घाईत असल्यामुळे वेळ देता आला नाही, पण मी १७ तारखेला पुन्हा येईल. त्यावेळेस आपण बोलू. या वेळेस तुम्हाला ज्याला पाडायचे, त्याला पाडा. ज्याला आणायचे, त्याला आणा पण निवडणूक संपल्यावर लगेच आपण आरक्षणासाठी आंदोलन सुरु करणार, अशी भूमिका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मांडली.