Navratri 2024 : तुळजाभवानी संस्थान येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन,नऊ दिवस धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल

Navratri 2024 : मूर्तिजापूर तालुक्यातील तुळजाभवानी संस्थान येथे ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांसह देवी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह भाविकांमध्ये विशेष उत्साह निर्माण करणार आहे.
Navratri 2024 akola Tuljabhavani Temple
Navratri 2024 akolasakal
Updated on

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र तुळजाभवानी संस्थान, विराहित येथे नवरात्र महोत्सवाचे गुरुवार, ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. देवी नवरात्र महोत्सव, देवी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवसांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.

विदर्भाची कुलस्वामिनी असा नावलौकिक असलेले श्री क्षेत्र तुळजाभवानी संस्थान मूर्तिजापूर येथून १८ किलोमीटर अंतरावर विराहित या गावी आहे. हे संस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहे. येथील आई तुळजाभवानी नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा आहे.

तुळजा भवानी संस्थानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. देवी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये कथा प्रवक्ते म्हणून हभप गणेश महाराज पाटील (अजनी) यांच्या मधुर वाणीतून भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहेत. नवरात्र महोत्सव वारकरी शिक्षण सम्राट गुरुवर्य हभप शिवराम महाराज वक्टे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. घटस्थापना गुरुवारी (ता.३) होणार आहे.

तसेच देवी भागवत प्रारंभ शनिवारी (ता.५) सकाळी ९ वाजता होणार आहे. या नवरात्र महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री तीर्थक्षेत्र तुळजाभवानी संस्थान कार्यकारी मंडळ, श्री संत गजानन महाराज संस्थान सेवाधारी महिला मंडळ, भक्तगण व समस्त गावकरी मंडळी विराहित यांनी केले आहे.

होम विधीचा कार्यक्रम लक्षवेधी

तुळजाभवानी संस्थान येथे होम विधीचा कार्यक्रम लक्षवेधी असतो. शुक्रवारी (ता.११) ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. होमहवन होणार आहे. नवरात्रनिमित्त या आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन

या नवरात्र महोत्सवामध्ये दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ५ ते ६ काकडा, सकाळी ६.३० ते ७.३० आरती, ८ ते ९ ग्रामसफाई, सायंकाळी ६.३० ते ७. ३० महाआरती, ७.३० ते ८. ३० हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होणार आहे. शनिवारी (ता.१२) सकाळी १० वाजता हभप गणेश महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.