Khesari Lal Yadav Bhojpuri singer banned for 2 years Delhi High Court rules  SAKAL
मनोरंजन

Khesari Lal Yadav: खेसारी लाल यादवला मोठी शिक्षा, यापुढे कोणत्याही कंपनीसोबत काम करु शकणार नाही, वाचा सविस्तर

Devendra Jadhav

Khesari Lal Yadav News: भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव सध्या चांगलाच चर्चेत आहे. खेसारी लाल यादवच्या वादग्रस्त प्रकरणाची केस कोर्टात सुरु होती. अखेर या केसवर कोर्टाने निकाल दिलाय.

दिल्ली उच्च न्यायालयाने खेसारी लाल यादववर बंदी घातली आहे. ज्यात कोर्टाने निर्देश दिले आहेत की, खेसारी लाल यादव पुढील दोन वर्षांसाठी फक्त एकाच कंपनीसाठी गाणे गाणार आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आम्ही तुम्हाला सांगतो.

(Khesari Lal Yadav Bhojpuri singer banned for 2 years Delhi High Court rules)

का मिळाली खेसारी लाल यादवला शिक्षा?

खेसारी लाल यादवला इतकी मोठी शिक्षा का मिळाली यामागचं कारण म्हणजे... ग्लोबल म्युझिक जंक्शन या म्युझिक कंपनीसोबत खेसारी लाल यादवने कॉन्ट्रॅक्ट केला होता. २७ मे २०२१ ला खेसारीने या कंपनीसोबत हा करार केला होता. या करारानुसार खेसारीला ३० महिन्यांमध्ये २०० गाणी गाणं भाग होतं. खेसारीला त्यासाठी ५ कोटी रुपये मिळणार होते.

परंतु खेसारीने ३० महिन्यात केवळ ८९ गाणी गायली. त्यामुळे कंपनीसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन झाले. हा वाद पुढे कोर्टात गेला. आणि कंपनीने कोर्टात ही केस जिंकली

या तारखेपर्यंत खेसारी गाणं गाऊ शकणार नाही

दिल्ली कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार खेसारी लाल यादव ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एकही गाणं गाऊ शकणार नाही. कोर्टाने दिलेल्या शिक्षेनुसार खेसारी फक्त ग्लोबल म्युझिक जंक्शन शिवाय अन्य कोणत्याही कंपनीसाठी २ वर्ष गाऊ शकणार नाही.

खेसारीला ही मोठी शिक्षा मिळाली असुन या शिक्षेनुसार खेसारीला त्याचं अपूर्ण राहिलेला करार पूर्ण करता येईल. पण इतर कंपन्यांसाठी गाणी गाता येणार नाहीत.

झालेल्या शिक्षेवर खेसारी काय म्हणाला

दिल्ली हायकोर्टाने खेसारीला शिक्षा सुनावली. या संपूर्ण प्रकरणावर खेसारी लाल यादव यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. खेसारीने कंपनीवर कट रचल्याचा आरोप केला आहे. खेसारीने सांगितले की, "त्याला इंग्रजी समजत नाही आणि कंपनीने या गोष्टीचा फायदा घेतला." करारात आपली फसवणूक झाल्याचा दावा त्याने केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

IND vs PAK T20WC : what a ball…! पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का, Renuka Singh ने उडवला त्रिफळा, Video

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Maharashtra Politics: मोदींचं मंदिर बांधलेला भक्त सावध झाला; भाजपला मात्र 'राम राम' ठोकला

SCROLL FOR NEXT