मुंबई- निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या दिशेनं वादळाचा वेग वाढला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)भागात ठेवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. या वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस येण्याची शक्यता असून यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. यासाठी NDRF च्या टिम देखील सज्ज आहे. यामुळे दक्षता म्हणून बीकेसी भागातल्या कोरोना रुग्णांना दुसऱ्या स्थळी सुरक्षित हलवण्यात आलं आहे.
दुसऱ्या कोविड सेंटरमध्ये रवानगी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीत नवीन कोविड सेंटर उभारलं आहे. या चक्रीवादळाचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधल्या कोविड सेंटरलाही धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरु आहे. 60 कोरोना रुग्णांची गोरेगाव आणि वरळीमधील कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे. बीकेसीतील कोविड सेंटरमधील इतर वैद्यकीय सुविधाही सुरक्षित ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये बुधावारी पहाटेपाससून वेगानं वारे वाहत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला मोठं वादळ आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. अलिबाग, ठाल नव्हंगाव आणि किहीम समुद्रकिनाऱ्याला या वादळाचा मोठा धोका आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे.
दादर, माहीम किनाऱ्यालगत राहणाऱ्या जनतेला आवाहन:
चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी जी उत्तर विभागातील समुद्राजवळ राहणाऱ्या जनतेला मुंबई महापालिकेनं आवाहन केलं आहे. आवश्यकता भासल्यास नागरिकांनी पालिकेनं सोय केलेल्या शाळांमध्ये स्थलांतरीत व्हावे असं आवाहन पालिकेनं केलं आहे. दादर, माहिम या परिसरात किनारपट्टीलगतच्या जनतेला हे आवाहन केलं आहे. दादर विभागाकरिता गोखले रोड मनपा शाळा आणि भवानी शंकर मनपा शाळा आणि माहीम करिता न्यू माहीम मनपा शाळेमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. कच्चा घरात राहत असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईत यंत्रणा सज्ज:
या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असून मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत.
BMC has shifted corona patients from BKC due to cyclone read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.