plasma blood tubes 
मुंबई

अरे वाह! आता खासगी रुग्णालयांनाही 'प्लाझ्मा' थेरपीची परवानगी; मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयात होणार चाचणी.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महापालिकेच्या काही प्रमुख रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा थेरेपीची सुरुवात केली गेली असून आता खासगी रुग्णालयांंना ही याबाबतची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना व्हायरस सारख्या विषाणुजन्य आजारावर प्लाझ्मा थेरपी चाचणी घेण्यास या रुग्णालयाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मान्यता मिळाली आहे. एप्रिलपासून ते आतापर्यंत सुमारे 500 कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार या ठिकाणी करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी एक प्रयोगात्मक प्रक्रिया आहे. या उपचार पद्धतीत कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोनावर उपचार घेण्याऱ्या रुग्णास टोचला जातो तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रुग्णालयाने रक्तदात्यांकडून प्लाझ्मा गोळा केला असून लवकरच या चाचण्या सुरू होणार आहेत.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) नुकतीच प्लाझ्मा थेरपी चाचण्या सुरू करण्याच्या रुग्णालयाच्या अर्जाला मान्यता दिली आहे. प्लाझ्मा थेरेपीमध्ये एका निरोगी व्यक्तीकडून आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती स्थलांतरीत करून रुग्णाचा आजार बरा करण्यास मदत करते.

या थेरपीमध्ये कोरोना व्हायसरवर मात केलेल्या रुग्णाकडून गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी अ‍ॅंटीबॉडीज तत्वाचा वापर केला जातो. बरं झालेल्या रुग्णाच्या रक्तातील घटक आजारी रुग्णाच्या इम्युनसिस्टिमला बळ देतात. जगभरात कोणतेही प्रमाणित उपचार उपलब्ध नसल्याने, या आजारावर उपचार करण्यासाठी अनेक औषधे आणि थेरपी एकत्रितपणे वापरल्या जातात आणि ही प्लाझ्मा चाचणी त्या दिशेने एक पाऊल आहे, असे वोक्हार्ट रुग्णालयाच्या क्रिटीकल केअरचे प्रमुख डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितले.

या प्लाझ्मा थेरपीचा पूर्वी इबोला विषाणूचा सारख्या संसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जात होता. त्या आधारावर आता ही चिकित्सा कोरोनासारख्या रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात आहे. 

"आम्ही रक्तपेढीशी करार केला आहे जेथे रक्तदात्यांनी त्यांचे प्लाझ्मा दान केले आहेत आणि चाचणी तसेच आवश्यकतेनुसार हा प्लाझ्मा योग्य रूग्णांना देण्यात येईल. देणगीदाराची ओळख पटल्यानंतर आम्ही त्याची संमती घेतो आणि प्लाझ्माडोनेशनसाठी रुग्णाला नेण्यापूर्वी एंटीबॉडीजची पूर्व तपासणी यासारख्या सर्व आवश्यक चाचण्या घेतल्या जातात. आम्ही प्रत्येक रक्तदात्यासाठी सुमारे 500 मिली प्लाझ्मा संकलित करतो. शिवाय, व्यक्ती महिन्यातून एकदा प्लाझ्मा दान करू शकते", वोक्हार्ट हॉस्पिटल सेंटरचे प्रमुख डॉ. पराग रिंदानी यांनी म्हंटलंय. 
plasma therapy will allowed in private hospitals also 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT