TCS issues transfer order to over 2,000 employees NITES files complaint  Esakal
Personal Finance

TCS ने पाठवली 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोटीस, कर्मचाऱ्यांची थेट सरकारकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

TCS Transfer Notice: कर्मचार्‍यांनी नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

राहुल शेळके

TCS Transfer Notice: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांच्या आत नियुक्त ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. आयटी कर्मचारी संघटना नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने (NITES) ही माहिती दिली.

सुमारे महिनाभरापूर्वी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयातून काम करणे बंधनकारक केले होते. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या काही ईमेलनुसार, त्यांना ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांची नोटीस देण्यात आली आहे.

कंपनीच्या लागू धोरणांवर आधारित कर्मचाऱ्यांना प्रवास आणि निवास खर्च दिला जाईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून कर्मचाऱ्यांना हे ईमेल मिळू लागले. कर्मचार्‍यांनी नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.

किमान 180 कर्मचाऱ्यांनी NITES कडे तक्रारी पाठवल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनीने योग्य सूचना किंवा चर्चा न करता कर्मचाऱ्यांच्या बदलीचे मेल पाठवले आहेत, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास होत आहे. IT युनियनने आता TCS विरुद्ध कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.

NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणाले, कंपनी कर्मचार्‍यांच्या सर्व आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या यांकडे दुर्लक्ष करत आहे. TCS कर्मचाऱ्यांना अनावश्यक त्रास देत आहे आणि त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करत आहे.

कंपनीने काय उत्तर दिले?

मनीकंट्रोलने विचारले असता, कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की हा कंपनीचा निर्णय आहे जो प्रशिक्षण घेतलेल्या फ्रेशर्ससाठी लागू केला गेला आहे, आता कर्मचाऱ्यांना प्रकल्पांवर काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांना कंपनीने उत्तर देण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT