Payal Naik

नमस्कार, मी पायल शेखर नाईक. मी सध्या ई-सकाळ वेबसाईटवर मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. मला मनोरंजन विषयक बातम्या लिहिण्याची आवड आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात कामाचा मला ४ वर्षांचा अनुभव आहे. मी बेडेकर कॉलेज, ठाणे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलेलं आहे. मी फेब्रुवारी २०२० मध्ये मी सकाळ ग्रुपच्या यिनबझ या युवा पत्रकारांसाठीच्या वेबसाइटसाठी इंटर्न म्हणून काम केलं. त्यानंतर मी महाराष्ट्र टाइम्स वेबसाइटसाठी १ वर्ष काम केलं. त्यानंतर मी हिंदुस्थान मराठीसाठी सहा महिने काम केलं आहे. त्यानंतर मी पुन्हा दोन वर्ष महाराष्ट्र टाइम्समध्ये कन्सल्टंट म्हणून काम केलं. तिथे मी युट्यूब चॅनेलसाठी भाऊ कदम, चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या कलाकारांच्या मुलाखतीदेखील घेतल्या आहेत. मला मनोरंजनासोबतच व्हायरल आणि लाइफस्टाइलच्या बातम्यांमध्येही रस आहे. चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज पाहण्याची मला आवड आहे.
Connect:
Payal Naik
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com