भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय. त्याचवेळी पूर्वसीमेवरील बांग्लादेश वर अचानकपणे सत्तापालटाचे कोसळलेले संकट हा भारतासाठी गंभीर इशारा ठरणार आहे. बांग्लादेशात गेल्या दोन महिन्यात जनक्षोभामुळे व युवकांच्या प्रक्षुब्ध आंदोलनात तीनशे लोकांच्या झालेल्या मृत्यूमुळे घाबरून तब्बल 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांना साऱ्या परिवारासह पलायन करून भारतात आश्रय घ्यावा लागला,