बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळात घुलाम मुक्तदीर गाझी हे मंत्री होते. 25 ऑगस्ट रोजी त्यांना अटक करण्यात आली. ते उद्योगपदी आहेत. ढाक्याच्या नारायणगंज भागात त्यांचा वाहनांचे टायर उत्पादन करणारा बांग्लादेशमधील सर्वात मोठा कारखाना होता. पण ज्या दिवशी हसीनांनी भारतात पलायन केले, त्या 5 ऑगस्ट रोजी आंदोलन करणाऱ्या झुंडींनी तो लुटायचे ठरविले व सुमारे तीनशे ते चारशे लोक त्यावर चाल करून गेले.