Ram Rahim Parole : मतदानाच्या तीन दिवस आधी राम रहीम जेलमधून बाहेर! विधानसभा निवडणुकीवर काय होणार परिणाम?

Haryana assembly election updates : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, अगदी दोन ते तीन दिवस आधी डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम याला पॅरोलवर जेलमधून सुटका मिळाली आहे.
Haryana assembly election updates
Haryana assembly election updates
Updated on

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, अगदी दोन ते तीन दिवस आधी डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम याला पॅरोलवर जेलमधून सुटका मिळाली आहे. बुधवारी सकाळी कडक सुरक्षाव्यवस्थेत रोहतकच्या सुनारिया जेलमधून राम रहीम बाहेर आला. राम रहीमला २० दिवसांची पॅरोल काही अटींच्या आधारावर देण्यात आळी आहे. त्यामुळे तो हरियाणा विधानसभा निवडणुकीत प्रचार करू शकणार आहे. यामुळे राम रीहमच्या अनुयायांमध्ये भाजप सरकार त्याची योग्य ती काळजी घेत असल्याचा संदेश पोहचत असल्याने त्याच्या सुटकेला विरोधकांकडून विरोध व्यक्त केला जात होता.

या सर्व घडामडींमधून हरियाणामध्ये राम रहीम किती प्रभावी आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. काँग्रेसने भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून यावर आक्षेप घेतला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर राम रहीम याचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार राम राहीम याचे हरियाणाच्या ९ जिल्ह्यात वर्चस्व असल्याचे सांगितले जाते, तब्बल ३० हून अधिक जागांवर त्याचा प्रभाव आहे. राज्यात ५० लाखाहून जास्त त्याचे फॉलोअर्स आहेत. बाबा फरलोवर बाहेर आल्याने त्याच्या समर्थकात संदेश पोहचतो की भाजप सरकार आल्यानंतर बाबा असेच बाहेर येत राहील.

डेरा सच्चा सौदामध्ये एक पॉलिटिकल अफेयर्स कमेटी असते, ही कमेटी ठरवते की कोणाला पाठिंबा द्यावा. बाबाचे काही खास लोक कोणत्याही राजकीय विषयासंबंधी होणारे लाभ आणि नुकसाना त्याच्यासमोर सांगतात, त्यानंतर बाबा निर्णय घेतो.

हरियाणा निवडणुकीत सर्वाधीक मारामारी दलित मतांसाठी आहे. कारण जाट मते ही काँग्रेसच्या बाजून आहेत. पंजाबी हिंदी आणि मागास वर्गाचे जास्तमते भाजपला मिळतात. बनिया आणि ब्राम्हण यांची काही मते काँग्रेसकडे जाऊ शकतात. या राज्यात तब्बल २० टकके मते ही दलित समाजाती आहेत.

काही राजकीय तज्ज्ञांच्या मते निवडणुकीच्या आधी राम रहीम याला फरलो दिला गेल्याचा परिणाम होईल. विशेषकरून काँग्रेसला याचा फटका बसू शकतो. हरियाणामधील गावांमध्ये जाट समाजाचा दबदबा कायम आहे. एससी समाज अद्यापही जाट समाजात मिसळू शकलेला नाही. बाबाच्या सुटकेमुळे दलित समाजाची मते भाजपच्या पारड्यात पडू शकतात असे सांगितले जात आहे.

Haryana assembly election updates
Helicopter Crash In Pune : पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले! तीन जणांचा मृत्यू

राम रहीमचा परिणाम कितपत टिकून आहे?

तुरुंगात गेल्यानंतर राम रहीमची जादू हळूहळू ओसरत जात असल्याचे दिसून येत आहे. पण जेव्हा तो जेलच्या बाहेर होता आणि त्यावकर कोणताही आरोप कोर्टात सिद्ध होऊ शकला नव्हता तेव्हा डेरा प्रमुख भारतीय जनता पक्षाला किती फायदा पोहचवत होता हा वादाचा विषय ठरू शकतो. तसे पाहाता बाबाच्या समर्थनाचा मतदानावर फारसा फरक पडला नाही.य

२०१४ मध्ये भाजपने संपूर्ण बहुमताने हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. राम रहीम याच्या समर्थनांतर देखील बाबा भाजपला निवडणुक जिंकून देऊ शकला नव्हता. ज्या सिरसामध्ये राम रहीमचं मुख्यालय आहे तेथे भाजप एक जागा देखील जिंकू शकला नव्हता. पंतप्रधान मोदींनी स्वतः सिरसा येथे एका रॅलीमध्ये डेरा सच्चा सौदाच्या कामाची स्तुती केली होती.

२०१९ मध्ये भाजपला पराभव पत्कारावा लागला. याच पद्धतीने २०१२ मध्ये कॅप्टन अमरिंदर यांचे सरकार देखील बाबा वाचवू शकला नव्हता,तेव्हा बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी कॅप्टन सपत्नीक सिरसा येथे गेले होते.

निवडणूक जिंकण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अनेक योग जुळून आल्यानंतरच एखादा पक्ष निवडणूक जिंकत असते. पण बाबाच्या इशाऱ्यावर समर्थक एका गठ्ठ्याने मतदान करतात हे देखील तेवढेच सत्य आहे. त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Haryana assembly election updates
Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा; नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत धावणार मेट्रो!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.