Jammu & Kashmir : पहिल्याच यादीवरून वादंग ; ४४ नावांवर फुली,१५ नेत्यांच्या नावांची घोषणा

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मोठे राजकीय नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Jammu & Kashmir
Jammu & Kashmirsakal
Updated on

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मोठे राजकीय नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. पक्षांतर्गत नाराजीनंतर श्रेष्ठींना ती यादी मागे घ्यावी लागली आणि त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास पंधरा उमेदवारांचा समावेश असलेली सुधारित यादी जाहीर करण्यात आली. पहिल्याच यादीमध्ये अनेक प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश नसल्याने पक्षात उघड नाराजी व्यक्त केली जात होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.