भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळी विधाने केली जात आहेत. इतकेच नाही तर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला देखील त्यांनी काँग्रेसचे आंदोलन म्हटले होते.