नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होत आहेत. यासाठी भाजपकडून ४४ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये उमेदवारांची नावे जाहीर करण्याबाबत भाजपने आघाडी घेतली असं म्हणावं लागेल. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे
जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका होत आहे. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा विशेष राज्य म्हणून असलेला दर्जा राहिलेला नाही. जम्मू आणि काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे.