Jammu and Kashmir: भाजपने जम्मू आणि काश्मीरसाठी जाहीर केलेली पहिली यादी घेतली मागे; कारण आलं समोर

BJP withdraws first list announced for Jammu and Kashmir: भाजपने जाहीर केलेली पहिली यादी स्थगित केली आहे. काही वेळापूर्वी 44 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली होती
BJP party
BJP Partyesakal
Updated on

नवी दिल्ली- भाजपने जम्मू आणि काश्मीरसाठी जाहीर केलेली पहिली यादी स्थगित केली आहे. काही वेळापूर्वी 44 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली होती .काही उमेदवारांच्या नावात अडचणी असल्याने यादी स्थगित केल्याची माहिती मिळत आहे. लवकरच नवी यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे.

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये ९० जागांसाठी निवडणुका तीन टप्प्यामध्ये होणार आहेत. यासाठी भाजपने आज सकाळी बैठकीनंतर ४४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पण, अचानक भाजपने ही यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यादीमध्ये काही नावाबाबत अडचणी असल्याचं भाजपने म्हटलं आहे. नवी यादी लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

BJP party
Terrorism In Jammu And Kashmir: पगार सरकारचा अन् काम दहशतवाद्यांसाठी, गुप्तचर यंत्रणेने समोर आणला भयंकर प्रकार

जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोंबर रोजी हे मतदान पार पडेल. निकाल तीन दिवसानंतर ४ ऑक्टोंबर रोजी लागेल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये २४ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यासाठी २६ जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यांत ४० जागांवर मतदान पार पडणार आहे.

BJP party
J&K Assembly Elections: भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; किती काश्मिरी पंडितांना तिकीट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.