नवी दिल्ली : हरियानात भाजपला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी काँग्रेसने ‘इंडिया’ आघाडीतील आप, सप व माकपला मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविल्याने काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा लांबणीवर पडली आहे. पंजाबमधील काँग्रेस नेते प्रताप सिंग बाजवा यांनी ‘आप’सोबतच्या आघाडीला तीव्र विरोध केला आहे. काँग्रेसने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीच्या निर्णयानंतर ‘आप’च्या आघाडीवर गुरुवारी रात्रीपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.