नवी दिल्ली : निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीचे तीन तेरा वाजले असून हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण आपनं काँग्रेसच्या नाकावर टिच्चून २० जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा सुरु आहे पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 5 ऑक्टोबर रोजी हरयाणात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.