Latest Haryana Election News: हरियाना विधानसभेला काँग्रेस व ‘आप’मध्ये जागावाटपाच्या सूत्रांवर एकमत होऊ न शकल्याने अखेर ‘इंडिया’ आघाडीतील या दोन्ही पक्षांची आघाडी होऊ शकली नाही. ‘आप’ने २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे आता हरियानात तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळाले आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियानात ‘आप’सोबत आघाडी करण्याच्या प्रस्तावावर विचार करावा, असे सूतोवाच केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकांना सुरवात झाली. परंतु हरियानातील जागावाटपावरून या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. विधानसभेसाठी ‘आप’ने किमान १० जागांची मागणी केली होती. परंतु काँग्रेसने पाचपेक्षा अधिक जागा देण्याची तयारी दर्शविली नाही. यावरून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय होऊ