Jammu Kashmir Election: नंदनवनात मतदानाचा बहर, ५९ टक्के मतदान; ६४ जणांचे भवितव्य यंत्रात बंदिस्त

Jammu Kashmir Voteing: जम्मू-काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर येथे प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे.
Jammu Kashmir Election 59 percent turnout The fate of 64 people is locked in the machine
Jammu Kashmir Election 59 percent turnout The fate of 64 people is locked in the machinesakal
Updated on

Jammu kashmir Latest News: दहा वर्षांनंतर होत असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान बुधवारी शांततेत झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ५९ टक्के मतदान झाले.

कडेकोट बंदोबस्तात सकाळी सातपासून मतदानाला सुरवात झाली. या पहिल्या टप्प्यात ६४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि पूर्वीच्या राज्याचे लडाख आणि जम्मू-काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर येथे प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे.

Jammu Kashmir Election 59 percent turnout The fate of 64 people is locked in the machine
Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान; कधी होणार मतमोजणी?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.