Sheikh Hasina : प्रणव मुखर्जी यांनी शेख हसीना यांच्यासाठी तयार ठेवलं होत विमान, २००९ मधील त्या प्रकरणात भारताने वाचवली होती हसीना यांची खुर्ची

प्रणव मुखर्जी यांच्या आदेशावरून ‘जर शेख हसीना यांच्या केसाला जरी धक्का लागला तर भारतीय सैनिक तुमच्यावर तुटून पडतील’, असा दमच भारतीय सैनिकांनी बांगलादेशी लष्कर प्रमुख मोईम उद्दीन अहमद यांना दिला होता.
Sheikh Hasina
Sheikh Hasina esakal
Updated on

Sheikh Hasina :

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नुकतेच पदाचा राजीनामा देऊन देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून बांगलादेश पेटला होता. यामुळे  अनेक दंगलीही तिथे घडल्या होत्या. त्यावरूनच शेख हसीना यांनी काढता पाय घेत देश सोडला आहे.

शेख हसीना यांच्यावर अशी वेळ पहिल्यांदाच आलेली नाही. याआधी 2009 मध्ये त्यांच्यावर असाच प्रसंग आला होता. तेव्हा भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शेख हसीना यांचे समर्थन केले होते. त्यावेळी प्रणव मुखर्जी यांच्यामुळे हसीना यांचे पदही वाचले होते. नक्की घटना काय हे जाणून घेऊयात. (Bangladesh violence sheikh hasina step down)

Sheikh Hasina
Bangladesh PM Sheikh Hasina: शेख हसीना यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, भारतात आश्रय घेणार?

2009 मधील फेब्रुवारी महिन्यात बांगलादेश रायफल्सने  विद्रोह केला होता. यावेळी सैन्यातील मोठे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती. बांगलादेशचा इतिहासात असा नरसंहार कधीच झाला नव्हता. शेख हसीना 2008 मध्येच पंतप्रधानपदी बसल्या होत्या. पंतप्रधान बनल्यानंतर शेख हसीना यांनी देशाचा संरक्षण खात स्वतःकडे ठेवलं होतं. आणि जेव्हा हा नरसाहार घडला तेव्हा त्या गोंधळून गेल्या आणि त्यांनी भारताला मदतीची साद घातली.

बांगलादेशमध्ये हत्याकांड थांबायचं नावच घेत नव्हते. तेव्हा शेख हसीना यांनी भारताचे तत्कालीन विदेश मंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. हसीना यांच्या हाकेला प्रणव मुखर्जी धावून आले. त्यांनी हसीना यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. इतर देशांनीही शेख हसीना यांची मदत करावी यासाठी प्रणव मुखर्जी यांनी इतर देशांच्या मंत्रालयांसोबत चर्चा केली होती.

Sheikh Hasina
Sheikh Hasina House : कोणी बेडवर झोपला तर काहींचा जेवणावर ताव! शेख हसीनांच्या घरात घुसून लोकांचा धुडगूस; समोर आला Video

शेख हसीना यांच्या मदतीसाठी पॅराशुट रेजिमेंटची सहावी बटालियन तैनात करण्यात आली होती. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या सुरक्षेसाठी उतरण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना भारतीय सैनिकांना देण्यात आल्या होत्या. भारतीय सैनिकांना बांगलादेश मधील ढाका एअरपोर्ट उतरून शेख हसीना यांना सुरक्षा पुरवण्यास सांगण्यात आले होते.

बांगलादेशातील लष्करी अधिकारी हसीना यांच्यावरती भयंकर चिडले होते. कारण त्यांच्या सरकारमध्येच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना जीव गमावा लागला होता. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांच्या आदेशावरून ‘जर शेख हसीना यांच्या केसाला जरी धक्का लागला तर भारतीय सैनिक तुमच्यावर तुटून पडतील’, असा दमच भारतीय सैनिकांनी बांगलादेशी लष्कर प्रमुख मोईम उद्दीन अहमद यांना दिला होता.

Sheikh Hasina
Bangladesh Sheikh Hasina : पंतप्रधान शेख हसीना पायउतार! बांगलादेशमध्ये काय होणार? लष्करप्रमुखांनी स्पष्टच सांगितलं...

भारताने दिलेल्या धमकीनंतर विद्रोही शांत झाले आणि भारतीय सैन्याला त्यांच्यावर तुटून पडण्याची गरजही पडली नाही.

फेब्रुवारी 2009 मध्ये काय घडलं होतं

बांगलादेश रायफल्स वर्षातून तीन दिवस एक सोहळा साजरा करतात. त्या सोहळ्याला लष्करातील सर्वाधिकारी नव्याने रुजू झालेले जवान आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र येऊन भेटतात जल्लोष करतात. 2009 च्या फेब्रुवारी मध्ये सुद्धा असाच एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. तो 24 फेब्रुवारी रोजी होता. 24 फेब्रुवारीला या कार्यक्रमाला पंतप्रधान शेख हसीना यांनी सुद्धा हजेरी लावली होती.

पण जर 25 फेब्रुवारी 2009 रोजी या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमात काही अधिकारी हत्यार घेऊन पोहोचले.  बंदुकधारी अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद घालत होते. तेव्हा त्यांच्याकडे लक्ष्य न दिल्याने. एका अधिकार्यावर जाव्नाने बंदूक रोखली. यावेळी या हॉलमध्ये एकमेकांशी चर्चा करण्यात भेटण्यात हसण्या-खेळण्यात मग्न असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

Sheikh Hasina
Sheikh Hasina: कोण आहेत बांग्लादेशच्या शेख हसीना? वडिलांची राष्ट्रपती भवनात घुसून करण्यात आली होती हत्या !

अचानक झालेल्या या गोळीबारामुळे बेसावध अधिकारी मृत्युमुखी पडले. काही लोक स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाले तर काही लोक इतरांचा जीव वाचवताना शहीद झाले. पण ही घटना आजही बांगलादेशच्या इतिहासात दुखरी बाजू म्हणून कोरली गेली आहे.

या नरसंहारात तब्बल 75 हुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.  यामध्ये 57 लष्करी अधिकारी होते. या हल्ल्यात बीडीआरचे महानिदेशक शकील अहमद यांचाही मृत्यू झाला. तसेच सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.