Sonam Wangchuk Detained:"मोदीजी तुमचा अहंकारही मोडेल," सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात; मध्यरात्री दिल्लीत काय घडलं? पाहा व्हिडिओ

Sonam Wangchuk Detained In Delhi Viral Video: हा प्रकार समोर आल्यानंतर राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. गांधी यांनी ट्विटरवरून पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.
Sonam Wangchuk Detained
Sonam Wangchuk DetainedEsakal
Updated on

लडाखमधील समाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह लडाखमधील सुमारे 150 लोकांना दिल्ली पोलिसांनी सिंघू बॉर्डरवरून ताब्यात घेतले आहे. लडाक केंद्रशासित प्रदेशाला सहाव्या अनुसूचीचा दर्जा देण्याची मागणी करत वांगचुक दिल्लीकडे कूच करत होते.

हा प्रकार समोर आल्यानंतर राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी रात्री उशिरा ट्विटरवरून दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते म्हणाले की, शेतकऱ्यांप्रमाणेच लडाखीचे लोकही त्यांना त्रास देण्यासाठी तयार केलेले चक्रव्यूह तोडतील आणि तुमचा अहंकारही मोडेल.

पोलिसांनी सोनम वांगचुक आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना ताब्यात घेतलं आणि नरेला इंडस्ट्रियल पोलिस स्टेशनला नेलं. सर्व आंदोलकांना येथे ठेवण्यात आले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय दिल्लीतील अनेक भागात बीएनएसचे कलम 163 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत एकाच ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.

Sonam Wangchuk Detained
Gas Cylinder: सिलेंडरच्या किमतींत वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

दिल्ली चलो पदयात्रा

ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक आणि त्यांच्या साथीदारांना अलीपूर पोलीस स्टेशन आणि दिल्ली-हरियाणा सीमेवर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. मोर्चात सहभागी महिलांना ताब्यात घेण्यात आलेले नाही.

लेह एपेक्स बॉडीने दिल्ली चलो पदयात्रेचे आयोजन केले आहे. कारगिल लोकशाही आघाडीही या मोर्चात सहभागी आहे. गेल्या ४ वर्षांपासून दोन्ही संघटना लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी मागणी करत आहेत.

त्यांच्या मागण्यांमध्ये लवकरात लवकर नोकर भरती प्रक्रिया सुरू करावी, लडाखसाठी लोकसेवा आयोग असावा. यासह लडाख आणि कारगिलसाठी लोकसभेच्या स्वतंत्र जागा देण्याचीही मागणी आहे.

Sonam Wangchuk Detained
Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.