Olympic Players from Uttarakhand: पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी परल्यानंतर खेळाडूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Players meet Chief Minister Pushkar Singh Dhami: पुढील वाटचालीसाटी शुभेच्छा देत खेळाडूंना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
CM Dhami with Olympic Players in Uttarakhand
CM Dhami with Olympic Players in UttarakhandSakal
Updated on

Uttarakhand: ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगीरी केल्यानंतर खेळाडू मायदेशी परतले आहेत. उत्तराखंडमधून सहभागी झालेले खेळाडू देखील आपल्या राज्यामध्ये पोहोचले आहेत. यावेळी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अंकिता ध्यानी, परमजीत सिंह आणि सूरज पंवार यांची भेट घेतली आहे. धामी यांनी तिन्ही खेळाडूंना शाल आणि पुष्पगुच्छ देत सन्मानित केले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले अंकिता ध्यानी, परमजीत सिंह आणि सूरज पंवार हे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री तिन्ही खेळाडूंना शुभेच्छा देत म्हटले, "येणाऱ्या स्पर्धांमध्ये तुम्ही निश्चितच उत्तम कामगिरी कराल असा आम्हाला विश्वास आहे. राज्य सरकार व जनतेचे प्रेम हे कायम तुमच्या सोबत असणार आहे". पुढे त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या.

CM Dhami with Olympic Players in Uttarakhand
Olympic Bronze Medalist स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत; ढोल-ताशा, हलगी, झांजपथकाच्या गजरात मिरवणूक सुरू

ऑलिम्पिकमध्ये सूरज पंवार याने ४२ किमी रेस वॉक मिक्स रिले, परमजीत सिंहने २० किमी रेस वॉक तर अंकिता ध्यानीने ५ हजार मीटर रेस यामध्ये सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.