Vinesh Phogat: काँग्रेसला जे 25 वर्षे जमले नाही ते विनेशने एका झटक्यात करुन दाखवले, 5 निवडणुकांनंतर जिंकला जुलाना मतदारसंघ

Vinesh Phogat Won From Julana: या निवडणुकीत विनोश फोगाट विरोधात भाजपच्या योगेश कुमार यांच्यासह 13 उमेदवार होते. यामध्ये विनेशने पाच हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
Vinesh Phogat with supporters after winning the Julana constituency election.
Vinesh Phogat celebrates her victory in the Julana constituency, marking a significant achievement in her political journey.Esakal
Updated on

नुकत्याच झालेल्या हरियानाच्या विधानसभा निवडणुकीत ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने जुलाना या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आज या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये विनेश फोगाटने बाजी मारत भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला.

विनेशेचा हा विजय फक्त तिच्यासाठीच खास नाही तर काँग्रेससाठीही खास आहे. कारण गेली 25 वर्षे आणि 5 निवडणुकांमध्ये काँग्रेसला येथून विजय मिळवता आलेला नव्हता.

या निवडणुकीत विनोश फोगाट विरोधात भाजपच्या योगेश कुमार यांच्यासह 13 उमेदवार होते. यामध्ये विनेशने पाच हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

"बलाढ्य जुलमी शक्तींविरुद्ध विजय"

दरम्यान विनेशने मिळवलेल्या या विजयानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने विनेशला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या एक्स पोस्टमध्ये बजरंग म्हणाला, "देश बेटी विनेश फोगटला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. ही लढत केवळ एका जुलाना मतदारसंघासाठी नव्हती किंवा केवळ पक्षांमधील नव्हती. हा लढा देशातील सर्वात बलाढ्य जुलमी शक्तींविरुद्ध होता. आणि यामध्ये विनेश विजेती ठरली."

Vinesh Phogat Assembly Election Won
Vinesh Phogat Assembly Election WonEsakal

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार जुलाना मतदारसंघाची 15 पैकी 15 फेऱ्यांची मतमोजणी झाल्यानंतर काँग्रेसच्या विनेश फोगाटला 64491 इतकी मते मिळाली. तिच्या मतांची टक्केवारी 46.77 इतकी होती.

दुसरीकडे विनेशचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचे योगेश कुमार यांना 58728 इतकी मते मिळाली तर त्यांच्या मतांची टक्केवारी 42.59 इतकी होती.

दरम्यान हरियानात स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाने विनेश विरोधात दिलेल्या उमेदवाराला केवळ 1266 मते मिळाली.

Vinesh Phogat with supporters after winning the Julana constituency election.
Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 : हरियानाच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व,काँग्रेस चीतपट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.