Haryana Election: राहुल गांधींना पहिली सलामी हरियानाची अन् दुसरी महाराष्ट्राची; फडणवीसांनी नेमकं काय केलंय निकालाचं विश्लेषण?

हरियानात दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात प्रदेश भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
Rahul Gandhi _ Devendra Fadnavis
Rahul Gandhi _ Devendra Fadnavis
Updated on

मुंबई : हरियानात दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात प्रदेश भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. राहुल गांधी हे विरोधीपक्ष नेते झाल्यानंतर त्यांना पहिली सलामी हरियानानं दिली आहे तर दुसरी सलामी महाराष्ट्र देणार आहे, अशा खोचक शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला आहे.

Rahul Gandhi _ Devendra Fadnavis
Haryana 2024 election result: हरियानाला मिळणार दलित मुख्यमंत्री? या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा

फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान मोदींवर हरयानानं विश्वास दाखवला. कुठल्याच विरोधीपक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती. आम्हाला फेक नेरेटीव्हनं हरवलं. फेक नरेटिव्हचं उत्तर आता थेट नरेटिव्हनं दिलं आहे. हरयानात मागच्या निवडणुकीत आपल्याला 40 जागा मिळाल्या होत्या. यावेळी आपण सर्व रेकॉर्ड तोडले आणि 50 जागा मिळवल्या. 60 वर्षानंतर कोणता तरी पक्ष तीन वेळा जिंकत आहे. इथं खेळाडूंना घेऊन रान पेटवण्यात आलं. पण या सर्वांना मतदारांनी नाकारलं. त्यामुळं देशातील जनता देखील मोदींच्या पाठीशी आहे" #ElectionWithSakal

Rahul Gandhi _ Devendra Fadnavis
Haryana Election Result 2024: हरियानाची राजकीय खेळपट्टी ज्यावर वीरेंद्र सेहवागने केली होती 'फलंदाजी', आता कोण करतंय स्कोर?

राहुल बाबा विरोधीपक्ष नेता झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करत आहेत. राहुल गांधी यांना पहिली सलामी हरयानानं दिली आहे तर दुसरी सलामी महाराष्ट्र देणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली. पाकिस्तान सांगत होतं की जम्मू-काश्मीर भारतात नाही. पण ही निवडणूक पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आम्ही घेतली. #ElectionWithSakal

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार कुणाचं बनतं हे महत्वाचं नाही. दोन्ही राज्यात ज्या पद्धतीनं जनतेनं समर्थन दिलं त्यावरुन आम्हाला अधिक काम करण्याचा आत्मविश्वास दिला आहे. फेक नरेटिव्हवर एखादी निवडणूक जिंकता येते पण काम करून वारंवार निवडणूक जिंकता येतात, अशा शब्दांत फडणवीसांनी यावेळी काँग्रेसला टार्गेट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.