जे कधी स्वतःच्या घरातून बाहेर पडले नाहीत त्यांना १५०० रुपयांत काय होते, दुसऱ्याच्या घरात काय सुरू आहे हे कसे कळणार?
कोल्हापूर : ‘महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेले १५०० रुपये खूप महत्त्वाचे आहेत. पण, ज्यांच्यात देण्याची दानत नाही, जे माझे कुटुंब, माझी जबाबदारी इतकेच मर्यादित राहिले, घरातून बाहेर पडले नाहीत त्यांना त्याचे महत्त्व काय समजणार?,’ असा टोला खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता लगावला.