Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Vidhan Sabha election result: ''मी आज तुम्हाला एवढंच सांगतो, हा लाडका भाऊ तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की, लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला काहीतरी मदत झाली पाहिजे. त्यापुढे आम्ही तीन गॅस सिलिंडरची योजना आणली. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिली. लेक लाडकी योजना राबवली. या योजना विचारपूर्वक राबवलेल्या आहेत.''
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

CM Eknath Shinde: राज्यामध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचं श्रेय लाडक्या बहिणींना दिलं जात आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांच्या औक्षण केलं. यावेळी निलम गोऱ्हे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. शिंदे यांनी यावेळी बोलताना लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.