विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी आज कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी मुख्यंमंत्री शिंदे यांनी लाडकी बहिणसह सरकारच्या इतर योजना विरोधी पक्ष बंद करण्याच्या बाता करत असल्याची टीका केली.
यावेळी त्यांनी आमच्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा खोडा घालणाऱ्या तुम्ही जोडा दाखवा असे आवाहन या सभेसाठी उपस्थित असलेल्या महिलांना केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, "ही विधानसभा निवडणूक संपताच आम्ही महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे टाकरणार आहे."