Mahayuti: "गुजरातपेक्षा महाराष्ट्रच पुढे," फडणवीसांचा दावा; महायुतीच्या रिपोर्ट कार्डमध्ये नेमकं काय आहे?

Mahayuti Report Card: राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
Report Card Of Maharashtra Government
Eknath Shinde, Ajit Pawar And Devendra FadnavisEsakal
Updated on

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील युत्या-आघाड्यांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून महायुती सरकारने आज त्यांच्या कार्यकाळाचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थिती होते.

दरम्यान महायुतीच्या या रिपोर्ट कार्डमध्ये सरकारने त्यांच्या कार्यकाळात महिला, तरुण, शेतकरी, सरकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, रोजगार, आरोग्य, उद्योगधंदे, शहरी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि सांस्कृतीक वारसा या क्षेत्रात काय काय काम केले आहे, त्याबाबत सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा शंखनाद झाला म्हणत आपल्या मनोगताला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, "राज्यात स्थगिती सरकार जाऊन गती सरकार आल्यापासून राज्यात चौफेर काम सुरू आहे. आम्ही 2014 ते 2019 या काळात सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. त्याचप्रमाणे यावेळीही त्यांचे सरकार आले तर महायुतीने सुरू केलेल्या अनेक योजना ते बंद करतील."

यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र हे गुजरातपेक्षा पुढे असून महाविकास आघाडी याबाबत गैरसमज पसरवत आहे, असे सांगितले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीकडून फेक नेरेटीव्ह चालवण्यात येत आहे. याच प्रकारचे फेक नेरेटीव्ह त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत पसरवले. पण तरीही आमची योजना लोकप्रिय झाली आहे." यावेळी लाडकी बहीण योजना पुढील काळात बंद होणार नसल्याचीही हमी दिली.

महायुतीच्या या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "कार्यकाळात केलेल्या कामाचे रिपोर्ट काढायला हिंम्मत लागते आणि ती हिंमत महायुती सरकारमध्ये आहे. कारण आमच्या सरकाने गेल्या काही काळात असंख्य कामे केली आहेत."

Report Card Of Maharashtra Government
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा 2024 निवडणुका जाहीर; महाराष्ट्रात एकूण किती जागा? जिल्हानिहाय यादी पाहा एका क्लिकमध्ये

महाराष्ट्रात निवडणुका कधी?

निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्याचवेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.

#ElectionWithSakal

Report Card Of Maharashtra Government
Voter ID : मतदान ओळखपत्र नसल्यास मतदान कसे करावे? जाणून घ्या निवडणूक आयोगाचे नियम..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.