Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून आज (सोमवार) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख आहे. यादरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी करत विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. यानंतर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.