राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहे. महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या मतदारसंघातील कोरेगाव येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांना मोठे आश्वासन देत घोषणा केली आहे.