‘महायुतीने सुरू केलेल्या योजना जनतेला आवडल्या आहेत. यामुळे विरोधक चलबिचल झाले आहेत.'
गडहिंग्लज : ‘महायुती सरकारने लाडकी बहीण, कृषी वीज माफीसह विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तरतूद केलेला ७५ हजार कोटींचा खर्च शासनाच्या तिजोरीला परवडलेला आहे. बजेटने तो स्वीकारलाही आहे; परंतु केवळ सत्तेसाठी विरोधक आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचा आरोप करून राज्याची बदनामी करीत आहेत. त्यांना या निवडणुकीत जनताच धडा शिकवेल’, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. राज्यात पुन्हा महायुतीचीच (Mahayuti) सत्ता येणार असून, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.