राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तसेच सर्व पक्ष त्यांचे उमेदवार जाहीर करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेत निवडणुकीत उमेदवार उतरविण्याचे ठरवले आहे. त्यांनी आज उमेदवार जाहीर करण्यावर भाष्य केले आहे. मराठा समाजाचे नेते कधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? त्यांची यादी कधी जाहीर होणार? याची तारीखच आज मनोज जरांगे यांनी सांगितली आहे.
मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये सभा घेतली आहे. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, अठरा पगड जातीचे लोकांचा सामान्य जनता म्हणून सन्मान व्हावा, यासाठी यातना सहन केल्या. त्यासाठी आपलं दुःख जाणणारा कोणी नाही म्हणून हे आलेले आहेत. इतक्या संख्येने लोकं आलेत त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्हे आज झाले. अख्खी रात्र जगायची वेळ आली तरीही मी सगळ्यांना ऐकणार आहे. तसेच या निवडणुकीत आपले उमेदवार सगळे निवडून येणार आहेत. सगळ्यांचा सुफडा साफ होणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, उमेदवार तुम्हीच द्या असे मी सांगतोय. काही जण दोन दिवसाचा वेळ मागत आहेत. काही जण म्हणतात तुम्हीच निर्णय घ्या. एकेका जिल्ह्यातून ४०-५० आहेत. काही ठिकाणी १०-१२ काही ठिकाणी इच्छुक आहेत. बंडखोर किंवा उमेदवारी मिळत नसल्यानं ते आले आहेत. आघाडी युतीची संख्या जास्त आहे. मी आतापर्यंत कुणालाही पाठिंबा दिला नाही. या विधानसभा निवडणुकीसाठी ३० तारखेला कोणता मतदारसंघ आणि कोणता उमेदवार हे मी सांगणार आहे.
एका जातीवर जिंकणे अवघड आहे. त्यासाठी समीकरणे जुळवत आहे. आता अंधारात नाही तर उजेडात बैठका होतील. एकदा मराठ्यांनी अर्ज दाखल केला तर सरकणार नाहीत. त्यासोबत चार पाऊले मागे सरकायची तयारी आहे. मला राजकारणाची व्याख्या बदलायची आहे. १०० टक्के समाजकारण झाले पाहिजे. इतका बदल करायचं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील त्यांच्या मुलांच्या डोळ्यातील पाणी पुसायचे आहे. १४ महिन्यांपासून जो मराठा आरक्षण लढ्यात आहे तो मला देवासारखा आहे, असं ते म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.