मराठा समाजातील एका तरुणाने रक्ताने मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिले असून ते आता व्हायरल होत आहे. या पत्रात तरुणाने आपली व्यथा मांडली आहे. पत्र लिहिणारा तरुण नक्की कोण? हे अजून स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मिडीयावर एक पत्र प्रचंड व्हायरल होतं आहे. मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे व्यथित होत एका मराठा समाजातील तरुणाने रक्ताने हे पत्र लिहिले आहे. मनोज जरांगे यांची भूमिका महायुतीसाठी पोषक आहे असे पत्रात म्हटले आहे.