Manoj Jarange: लढायचं की पाडायचं? जरांगे पाटील 'या' तारखेला घेणार निर्णय; ईच्छुक उमेदवारांना काय दिल्या सूचना?

Manoj Jarange On Assembly Election: राज्यात आता निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशात आता मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
Manoj Jarange Patil On Assembly Election
Manoj Jarange PatilEsakal
Updated on

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत सतत चर्चा होत आहेत. अता अशात निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय 20 तारखेला होणार आहे.

या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय असणार याचा निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी 20 ऑक्टोंबरला समाजाची बैठक आयोजित केली आहे. यावेळी समाजातील जे कोणी निवडणूक लढवण्यासाठी उत्सक आहेत, त्यांनाही जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीला बोलावले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मंगळवारी जाहीर झाल्या असून, 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व युत्या आणि आघाड्या कामाला लागल्या आहेत. एकीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत.

अशात आता मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Manoj Jarange Patil On Assembly Election
Mahayuti: "गुजरातपेक्षा महाराष्ट्रच पुढे," फडणवीसांचा दावा; महायुतीच्या रिपोर्ट कार्डमध्ये नेमकं काय आहे?

विधानसभेच्या सद्यस्थितीबाबत बोलायचे झाले तर 288 सदस्यांच्या विधानसभेत 202 आमदार सत्ताधारी पक्षांचे आहेत. यामध्ये भाजपचे 102, राष्ट्रवादीचे 40, शिवसेनेचे 38 आणि इतर छोट्या पक्षांच्या 22 सदस्यांचा समावेश आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षात काँग्रेसचे 37, शिवसेनेचे 16, राष्ट्रवादी (एसपी) 16 आणि इतर छोट्या पक्षांचे सहा आहेत. त्याचवेळी 15 जागा रिक्त आहेत.

#ElectionWithSakal

Manoj Jarange Patil On Assembly Election
Satej Patil: सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांची चेष्टा चालवली आहे, विधानसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.