Manoj Jarange Patil: तर ठरलं! मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीसाठी थोपटले दंड, इच्छुकांची अंतरवाली सराटीत होणार मुलाखत

Maharashtra Assembly Elections : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा निहाय कोण कोण उभे राहणार यासंदर्भातली माहिती जाहीर करण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil news
Manoj Jarange Patil newsesakal
Updated on

राज्य सरकारने अद्यापही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नसल्याने, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी येत्या 7 ऑगस्टपासून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासोबतच इतर समाजातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. इच्छुकांची आंतरवाली सराटीत मनोज जरांगे स्वत: मुलाखत घेणार आहेत. मनोज जरांगेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

आंतरवाली सराटीत उमेदवारांची माहिती संकलन-

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुका निहाय इच्छुकांनी आपली माहिती अंतरवाली सराटीमध्ये आणून द्यायची आहे. सात ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होऊन दौरा करणार आहेत. त्यानंतर 13 ऑगस्टपासून इच्छुकांनी दिलेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे.

अर्ज सादरीकरण आणि छाननी प्रक्रिया-

इच्छुकांना स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल. 7 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाच्या छाननीसाठी कोअर समिती स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील, अशी विधानसभा निवडणुकीसाठीची रचना आखण्यात आली आहे. 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Manoj Jarange Patil news
Naresh Mhaske: नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द होणार? राजन विचारेंनी 'असा' टाकला डाव, उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

अंतिम उमेदवारांची घोषणा-

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा निहाय कोण कोण उभे राहणार यासंदर्भातली माहिती जाहीर करण्याची शक्यता आहे. जर राज्य सरकारने सगेसोयरे आणि मराठ्यांना कुणबीमध्ये आरक्षण दिले तर निवडणुकीच्या तयारी एवजी जल्लोषाची तयारी करून राज्यभर जल्लोष केला जाणार आहे.

Manoj Jarange Patil news
Puja Khedkar : कोर्टाने जामीनअर्ज फेटाळताच पूजा खेडकर परदेशात पसार? पोलिसांचं पथक होणार रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.