राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. याबाबत जरांगे पाटील यांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, "जिथे उमेदवार निवडणून येण्याची शक्यता आहे तिथेच उमेदवार उभे करायचे. यासह एससी आणि एसटीच्या जागा आहेत तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही."
ते पुढे म्हणाले की, "जे कोणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्या सर्वांनी अर्ज भरावे. अर्ज भरण्याच्या शेवटीच्या दिवसापर्यंत मी मतदारसंघांचा अंदाज घेऊन कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचा मागे घ्यायचा याचा निर्णय घेणार."