विधानसभा निवडणूक मध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवार ता.4 रोजी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे.
अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन दिवसापासून मनोज जरांगे समीकरण कसे जुळतील , उमेदवार ,मतदार संघ निवडणे या करीता प्रयत्न करत होते रविवारी जरांगे यांना उपस्थित इच्छुक व नागरीक यांच्या सोबत चर्चा केली होती पंधरा ते वीस जागेवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली होती परंतु उर्वरित यादी अंतिम झाली नाही, अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस व कमी वेळ शिल्लक राहिल्याने व मित्र पक्षाकडून यादी वेळेत न आल्याने जरांगे यांनी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.