मुस्लीम, दलित, मराठा समीकरणावर एकमत झालं आहे. मराठा, दलित आणि मुस्लीम आता एकत्र आले आहे. त्यानंतर आता मी बंजारा समाज आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार आहे. राज्यातील अन्यायाचं संकट परतवून लावायचं आहे. आता आम्हाला गुलामगिरीत जगायचं नाही, असं वक्तव्य मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. ते आज अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मराठा समाजाचे उमेदवार ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू आणि दलित नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीनंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. तसेच आता मराठा समाजाचे उमेदवार किती जागा लढवणार, यावर वक्तव्य केले आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचे उमेदवार कोणत्या जागा लढवणार आणि किती जागा लढवणार याबाबत येत्या तीन तारखेला निर्णय घेणार आहोत. विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व जागा लोकशाही मार्गानं लढणार आहोत. याच कोणाचीही दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही चालू देणार नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.