Maharashtra Vidhan Sabha: सरकार नालायक आहे, सरकाला सांगून उपयोग काय. तरुण आत्महत्या करत आहेत. मात्र असंवेदनशिल सरकारला याचे काही देणे घेणे नाही. आपण मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणासाठी लढणार असून आरक्षण मिळवून देणारच, असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
तरुणांनी आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. तुम्हाला मी आरक्षण मिळवूनच देणार आहे. तुम्ही जीव दिला तर उद्या मिळणाऱ्या आरक्षणाचा फायदा काय, असा सवालही श्री. पाटील यांनी व्यक्त केला. मी समाजासाठी लढत असून माझा शेवटही समाजासाठीच होईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.