छत्रपती संभाजीनगर : आमच्या मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहना’ योजना महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना म्हणून सुरू आहे. ही योजनाच निवडणुकीत गेम चेंजर ठरणार असल्याचे विरोधकांकडूनच सांगितले जात असल्याचा उल्लेख करत, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.