मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे. बंद पडेल, पैसेच मिळणार नाहीत असा खोटा प्रचार सुरू करण्यात आला.
कऱ्हाड : मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगून लाडकी बहीण योजना (ladki Bahin Yojana) सुरु केली. त्याविरोधात महाविकास आघाडी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) गेली. मात्र, उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला चपराक लावली. आता महाविकास आघाडी नागपूरच्या उच्च न्यायालयात गेली आहे. लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे १०० वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. ज्यांनी या योजनेला खोडा घातला, त्यांना जोडा दाखवून जाब विचारा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थितांना केलं.