पाथरी : मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांपेक्षा अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व माधवराव फड या अपक्षांचीच मोठी अडचण होणार आहे.पाथरी मतदारसंघात चाळीस उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार मीराताई रेंगे, माधवराव फड, दादासाहेब टेंगसे, डॉ. जगदीश शिंदे या प्रमुख उमेदवांरांचा समावेश आहे.