Ladki Bahin Yojana: "लाडकी बहीण योजना बंद करण्याचा डाव", कुणी केला दावा? विधासभेच्या रणधुमाळीत रंगताहेत आरोप-प्रत्यारोप

Maharashtra Vidhansabha Election 2024: "मी 'ऑन ड्यूटी २४ तास' आमदार असून, तालुक्याची जनता माझ्या मागे उभी आहे. त्यामुळे माझ्या विरोधात अजूनही विरोधकांचा उमेदवार ठरत नाही.
Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare On Ladki Bahin YojanaEsakal
Updated on

राजगुरुनगर: "महायुती सरकारने सुरू सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' व इतर योजना बंद करण्याचा महाआघाडीचा डाव आहे. पण जनतेला या योजना हव्या असल्याने जनतेने पुन्हा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे," असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी येथे केले.

खेड-आळंदी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार दिलीप मोहिते यांनी सोमवारी (ता. २८) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी खेड बाजार समितीच्या आवारात घेतलेल्या जाहीर सभेत तटकरे बोलत होत्या.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुरेखा मोहिते, अरुण चांभारे, कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.