महिलांना योजनेचे पैसे मिळू नयेत म्हणून महाविकास आघाडीचे नेते न्यायालयात गेले, त्यांची भूमिका महिलांविरोधी आहे.
सोलापूर : महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने अडीच वर्षात केले आहे. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये दिले जातील, अशी ग्वाही भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली.