यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या वाढ झाली. म्हणजे ५० हजार ९३ इतके मतदार इथे वाढले. लोकशाहीचा हा उत्सव प्रशासनानेही चांगलाच मनावर घेतल्याची चर्चा इथे होती.
ही वाढलेली मतदार नोंदणी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे, औत्सुक्याचे ठरले.
काँग्रेसकडून सय्यद मुजफ्फर हुसेन आणि भाजपकडून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली.
हात आणि कमळाची ही पारंपरिक लढाई कोण जिंकणार, ही वाढलेली मतदारसंख्या कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.